top of page
Writer's pictureAshita Patil

१६ जानेवारी २०२२ रोजी धर्मवीर संभाजीराजे स्मारक, पापाची तिकटी, कोल्हापूर.


छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी धर्मवीर संभाजीराजे स्मारक, पापाची तिकटी, कोल्हापूर. येथे सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान व संभाजी राजे स्मारक प्रेमी, यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस उदय भोसले व निरंजन शिंदे यांच्या हस्ते अभिषेक व श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन श्री जयेशभाई कदमसो व अश्किन आजरेकर आणि सचिन दादा तोडकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या वेळी प्रशासनाने दिलेले नियम पाळून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी स्मारकास फुलांची आरासने परिसर उजळून निघाला. स्मारकाच्या कामासंदर्भात होणारा विलंब या कामाची माननीय श्री जयेशभाई कदमसो आणि राजू भाई लिंग्रज यांनी महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत साहेब यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी १४ मे पर्यंत नियोजित संभाजी महाराज स्मारकाचे राहिलेले काम पूर्ण करून,उद्घाटन होईल असे सांगितले. या कार्यक्रमास राजूभाई लिंग्रज, संदीप देसाई, प्रताप उर्फ बापू कोंडेकर, अरुण गावडे,व स्मारक समितीचे अध्यक्ष श्रीराम जाधव, सह्याद्री शिलेदार चे अध्यक्ष अभिजीत सूर्यवंशी, फ़िरोज सत्तारमेकर, वैभव भोसले, देवेंद्र भोसले, अजित यादव, यांनी आणि शिवप्रेमी व शंभू प्रेमी उपस्थित होते. तसेच छञपती शिवाजी महाराज चौकात छञपती संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात छत्रपती संभाजी ब्रिगेड चे रुपेश पाटील यांच्या हस्ते अश्किन आजरेकर यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर आधारित पुस्तक भेट देण्यात आली. या वेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

3 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page